Gamtidar Ukhane in Marathi | गमतीदार मराठी उखाणे

Gamtidar Ukhane in Marathi गमतीदार मराठी उखाणे

Gamtidar Ukhane in Marathi | गमतीदार मराठी उखाणे

Gamtidar Ukhane in Marathi गमतीदार मराठी उखाणे

लग्नातील उखाण्यांची मजा 🎉

आजच्या काळात उखाण्यांनी पारंपरिकतेसोबतच स्मार्टनेस, विनोद आणि हलके-फुलके मजेशीर तडका घेतला आहे. त्यामुळे तरुणाईला “Gamtidar Ukhane in Marathi” अधिक आवडतात. “उखाणे” म्हटलं की महाराष्ट्रीय लग्नसोहळ्यात एक वेगळाच रंग भरतो. नवरदेव-नवरी जेव्हा नाव घेण्यासाठी गमतीदार ओळी म्हणतात तेव्हा संपूर्ण मंडपात हास्याची लाट उसळते.

Gamtidar Ukhane in Marathi | गमतीदार उखाणे मराठीमध्ये

  • धनत्रयोदशी करतात धनाची पूजा, …..रावांचे जीवावर करते मी मजा.
  • महादेवाच्या पिंडीवर वाहते बेलाचे पण वाकून, ….रावांच नाव घेते तुमचा मान राखून.
  • केळींच पान फाटलं टरकन, ….रावांच नाव घ्यायला लय भारी वाटलं.
  • झुळझुळ वाहे नदी मंदमंद वाहे समुद्र, सुखी ठेव परमेश्वरा ….. आणि माझी जोडी.
  • पौर्णिमेचा चंद्र चौकून चांदण्या आकाशात, ….रावांच फोटो भारताच्या नकाशात.
  • चांदीची सायकल, सोन्याची चैन, ….रावांच नाव घेते ……ची बहिण.
  • रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हास, ….रावांच नाव घेते तुमच्यासाठी खास.
  • शून्यातून शून्य गेला खाली राहिला शून्य, ….रावां सारखे पती लाभले हेच माझे पुण्य.
  • खडीसाखरेचा खडा खावा तेवढा गोड, ….साहेबांच बोलन अमृतापेक्षा गोड.
  • साजूक तुपात तळावे, ….रावां सारखे पती जन्मोजन्मी मिळावे.

Marathi Ukhane for Female Romantic | नवरीसाठी रोमँटिक उखाणे

नवरी जेव्हा गमतीदार आणि रोमँटिक उखाणे घेते तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणि कौतुक उमटतं.

  • नदीच्या काठावर धूत होते कपडा, ….रावांच हातात फुलांचा गजरा.
  • गणपतीला आवडतात दुर्वा, श्री कृष्णाला आवडते तुळस, ….रावांच नाव घ्यायला मला नाही येत आळस.
  • रामाने आणले रामफळ, सीताने आणले सीताफळ, लक्ष्मणाने आणली चुडी ….रावांच नाव घेते ….मंदिरा पुढे.
  • जन्म दिला मातेने पालन केले पिताने, ….रावांच नाव घेते पत्नी या नात्याने.
  • डबी में डबी, डबी में केक, ….राव हे माझे लाखो मे एक.
  • वृक्ष आणि लता, कवी आणि कविता, ….राव आहेत सागर आणि मी त्यांची सरिता.

Majedar Ukhane | मजेदार उखाणे मराठीमध्ये

  • नाव घ्या नाव घ्या आग्रह आहे सगळ्यांचा, ….रावांच नाव घेते सन आहे संक्रांतीचा.
  • संसार करते शक्ती पेक्षा युक्तीने, ….रावांच नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने.
  • राजहंस पक्षाचे गुंज गुंज डोळे, ….रावांच नाव माझ्या हृदयात खेळे.
  • चांदीच्या ताटाला हळदी कुंकूच खुण, ….रावांच नाव घेते …..ची सून.

Marathi Ukhane for Unmarried Girl | अविवाहित मुलींसाठी उखाणे

उखाणे केवळ विवाहित स्त्रियांसाठीच नाहीत. अविवाहित मुलीही संक्रांत, हळदी-कुंकू किंवा कौटुंबिक समारंभात मजेशीर उखाणे घेऊन रंगत वाढवतात.

  • चांदीच्या ताटात रेशमी खण, ….रावांच नाव घेते संक्रांतीचा सन.
  • संसार मुखी सागरात पती पत्नीची नौखा, ….रावांच नाव घेते सर्वांनी ऐका.
  • हातात घालते बांगड्या गळ्यात घालते ठुशी, ….रावांच नाव घेते संक्रातीच्या दिवशी.
  • राम गेले वनवासाला सीता करते नवस, ….रावांच नाव घेते आज हळदी कुंकवाचा दिवस.
  • मंगळसूत्राला दोन वाट्या सासर आणि माहेर, ….रावांच नाव घेते ….रावांनी दिला मला आहेर.

Long Marathi Ukhane for Female | लांब उखाणे नवरीसाठी

लांब उखाण्यांमध्ये मजेशीर ट्विस्ट असतो. कधी त्यात हळदीकुंकवाची गंमत, कधी लॉकडाऊनची आठवण, तर कधी सोशल डिस्टंसिंगची थट्टा.

  • लॉकडाऊन मध्ये लग्न करण्याचं, केलंय आम्ही Daring, …..सोबत सुरु आता, जीवनाचे Sharing.
  • शंकराच्या पिंडीवर, बेलाचे पान ठेवते वाकून, ………रावांचे नाव घेते, सोशल डिस्टंसिंग राखून.
  • वर्क फ्रॉम होम करणे म्हणजे, कठीण आहे टास्क, ……..रावांचे नाव घेते, तोंडाला लावून मास्क.
  • सोशल डिस्टंसिंग पाळत, घेतले आम्ही सात फेरे, …… रावांसोबत देते, ‘गो कोरोना गो’ चे नारे.
  • माझ्या Life मध्ये राजा भेटला Lukily, कोणी काही बोलले तर करतो माझी वकिली.

उखाण्यांचे महत्त्व

  • उखाण्यामुळे लग्नसोहळ्यात हास्य आणि मजा पसरते.
  • नवरदेव-नवरीची नावं गमतीशीर पद्धतीने घेतली जातात.
  • कधी पारंपरिक, तर कधी आधुनिक शैलीने उखाण्यांना स्मार्ट टच दिला जातो.
  • ही परंपरा सगळ्यांना एकत्र हसवते आणि क्षण अधिक संस्मरणीय बनवते.

निष्कर्ष

Gamtidar Ukhane in Marathi हे विवाहसोहळ्याची शोभा वाढवतात. मग ते रोमँटिक असोत, मजेदार असोत किंवा लॉकडाऊन-स्टाईल हटके असोत, उखाण्यांचा आनंद प्रत्येकाला आवडतोच.

👉 हे उखाणे वाचून तुम्हाला मजा आली असेलच. आता तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हे शेअर करायला विसरू नका.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *