Popular Marathi Ukhane – मराठी उखाणे

Marathi Ukhane – नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सर्वांचे स्वागत आपल्या marathiukhane.net वर. या वेबसाईटवर तुम्हाला मराठीत उखाणे पाहण्यास मिळतील. उन्हाळा चालू झाली कि लग्नाचा सीजन सुद्धा चालू होत असतो, लग्नात आपण नाव घे.. नाव घे… हे नक्की ऐकले असेल. महाराष्ट्रात लग्नानंतर उखाणे घेण्याची परंपरा आहे.
लग्न झाले का नवरदेवाला आणि नवरीला नाव घेण्यास खूप आग्रह केला जातो. त्यामुळे एकदा लग्न जमले का नववधू हे उखाणे (Marathi Ukhane) सापडण्याच्या मार्गाला लागतात आणि पाठ करण्याचा प्रयत्न करत असतात. महाराष्ट्रातील हि खूप जुनी परंपरा आहे पण ती केव्हा पासून अस्तित्वात आली आहे त्याची काही माहिती नाही, पण हि परंपरा आजून हि सुरूच आहे.
तर मित्रांनो जर तुमचे हि लग्न ठरले असेल तर तुम्ही एकदम योग ठिकाणी आला आहात, जर तुम्ही पुरुष असाल तर तुम्हाला या वेबसाईट वर मराठी उखाणे पुरुषासाठी (Marathi Ukhane for Male) आणि जर तुम्ही एक महिला असाल तर तुम्हाला मराठी उखाणे स्त्रीसाठी (Marathi Ukhane for female) एकदम उत्तम प्रकारे मिळून जातील. (Marathi Ukhane for Haldu Kanku)
पण यात पण तुम्हाला वेगवेगळे मराठी उखाणे पाहण्यास मिळतील जसे कि रोमँटिक मराठी उखाणे (Romantic Marathi ukhane) जर तुम्हाला सत्यनारायानाच्या पूजेसाठी (Satyanarayan Pooja Ukhane in Marathi) आणि जर तुम्ही तुम्हाला आधुनिक उखाणे मराठीत (Modern ukhane In Marathi) हवे असेल ते पण मिळून जाणार.
Marathi Ukhane for Bride
shubhkaryat सर्व स्त्रिया, होतात जबाबदार,
_ राव दिसतात, फारच रुबाबदार.
Alankarane सजली नवरी
नवरीच्या गळ्यात नाजुकशी सरी
मोठ्यांदा बोलते नका टवकान
….. रावांचे नाव घेते राखून तुमचा मान
फुलात फुल kamal…….. राव
माझे जीव कि shubhmangal
Ukhane in Marathi
Ratra pathi divas yeto हा पाठशिवणीचा खेळ……… रावांचा
वृक्ष तेथे माझे जीवन वेल
Chandnach ताट,sonyacha पाट, पंचपंक्वानांचा थाटमाट……… रावांचा
नाव घेते सोडा माझी वाट
विद्यादायिनी, विद्यावर्धिनी, शुभ्रवस्त्राधारिणी, वीणावादीनी,
शुभ्राहंसवासिनी सरस्वतीच्या वीणावादनावर थुई थुई नाचतो Mayur …..
रावांचे नाव घेते वडिलधाऱ्यांसमोर.
गणपतीच्या सोंडेला bghva रंग….. राव असतात नेहमी कामात दंग
मनाच्या वृंदावनात डोलते sobhagyachi तुळस….. रावांच नाव घ्यायला मला नाही
आळस कपाटा madhe ठेवला पैका ……. रावांच नाव घेते सर्वजण ऐका.
चंदनाच्या झाडाखाली हरिणी घेते विसावा, ……. रावांचे नाव घेते शुभ आशिर्वाद असावा.
वसंत ऋतुच्या आगमनाने शितल होते धरणीची काया ……. रावांचे नाव घेऊन पडते सर्वांच्या च्या पाया.
चंदनासारखे चमकावे उदबत्तसारखे जळावे,
……….. रावांना औक्ष मिळो हे देवापाशी मागावे
कळसूबाई पर्वतावर योगी बसले ध्यानाला,
…….रावांचे नाव घ्यायला मानपान कशाला.
दर्क्षाच्या बागेत वेल कसा डोलतो……
रावांनी घेतलेल्या साडीचा रंग कसा खुलतो..!!
सौभाग्यया चया प्रेमळ रुपी सागरात प्रेम रुपी सरोवर,
आयुष्याचा प्रवास करते…… बरोबर
नव्या प्रवासाच्या नव्या आशा, नव्या घरी पदार्पण,
…… च्या जीवनी माझे सर्वस्व अर्पण
टापटीप अरोग्याचे मूळ,
………… रावांसाठी सोडले माहेरचे मूळ…
छन छन बांगड्या, खण खण पैंजन,
… रावांचे नांव घेते, ऐका सारे जण.
गोकुळा सारखं सासर, सारे कसे हौशी
… रावांचे नांव घेते, तिळ संक्रांती च्या दिवसी.
माहेर तसं सासर, नाते घट्ट आणि संबंधही जुने,
… रावं आहेत सोबत, मग मला कशाचे उणे.
कपाळाचं कुंकु, जसा चांदण्यांचा व वसा,
… रावांचे नांव घेते, सारे जण बसा.
पर्जन्याच्या आणि रावांच नाव ऐकून गार,
… रावांच्या नावाने घालते मंगल सुत्रांचा हार.
मंदिरात जाऊन वाहाते, फुल आणि पान,,
… रावांचे नांव घेते, ठेऊन सर्वांचा मान.
रातराणीचा सुगंध, सुंदर मंद वारा,
… रावांचे नांवाचा, भरला हिरवा चुडा.
खडी साखरेची गोडी अन् फुलांत फूल कमलाच सुगंध,
… रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.
गणपती बाप्पा ला परमेश्वराची मुर्ती,
… रावांचे नांव घेऊन करने इच्छापूर्ती.
वय झाले लग्नाचे, लागली प्रेमाची चाहूल,
… रावांचे जीवनात आणि घरात टाकले मी पाऊल.
घातली मी शुभ वरमाला हसले… राव गाली,
थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.
जेव्हा मी ह्यांना पाहते चोरुन विचार करते deep होऊन,
घडविले देवानी… रावांना जीव लावून,
राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार,
… रावनी घातला मला मंगळ शनी हार,
चंद्र त्याला kajlacha टिळा आकाशात दिसतो साजरा,
… रावांनी आणला मला मोग-याचा गजरा,
दीन दुबळ्यांचे गाहाने परमेश्वरानी ऐकावे,
… रावा सारखे पत्ती मिळाले आणखी काय ,, भाग्य काय मागावे.
हवेतील मधुर वारा छेडीतो, माझ्या अंगाला,
… रावांचे नांव घेते सुर्यनारायनाच्या साझीला.
चंदेरी सागरात, सुंदर लाटा,
… रांवाच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा.
गोडवा रचू लाडूचा तुपात तळावे,
…रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे.
हिमालय पर्वतावर, मांडू सोभग्याच्या राशी.
… रावांचे नांव घेते… च्या दिवशी.
वेळेचे काळचक्र फिरते रात्रंदिवस कधी पूर्व कधी अवस,
…रावांचे नांव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस,
शरदाचे संपले अस्तीत्व, वसंताची लागली चाहूल,
…रावांच्या संसारात टाकते आयुष्याचे शुभ पाऊल.
Marathi Ukhane for Groom
वाटीत वाटी त्यात गाजरचा हलवा, नाव घेतो माझ्या….ला बोलवा…
लग्नाची तारीख केली फिक्स फास्टच फास्ट आता…च माझी फस्ट न लास्ट.
आंब्याच्या झाडाला मोहर त्यावर
आंब्यात आंबा. हापूसचा आंबा… च नाव घेतो, आता थोड थांबा.
माझी पत्नी आहे दिव्याची वात..
बरोबर लवकरच घेणार आहे फेरे सात.
इंद्रधनुष्य असते सप्तरंगी दिसते जेव्हा.पावसा असते ऊन… च नाव घेतो बनवुन तिला…. ची सुन.
उनाल्यात होत गरम हवा असतो थंड थंड वारा…..अन् थंड वारा जिवनात आल्यापासून झालाय आनंद सारा.
भारतात होता खजिनांचा साटा… बरोबरच चालायच्या आहेत जीवनाच्या सर्व वाटा.
चांदीच्या डिश मध्ये माव्याचे पेढे..…. सोडुन बाकी सगळेवेडे..
Coco cola open करतो तेव्हा आवाज येतो बुडबुड….. च नाव घेताना, कशाला करता तुम्ही लुडबुड.
दुधाच दही, दह्याच लोणी, लोणीच तुप तुपाच रूपअन *** च माझ्यावर प्रेम खुप.
चंदनासारखी झिजावे उदबत्ती सारखे जळावी,
……. सारखे पति जन्मोजन्मी मिळावे.
आकाशात दाटून आले मेघ, मोर लागले नाचायला,
…… नाव घेण्यासाठी आग्रह कशाला.
मेघ आले आकाश भरून, मोराने फुलविला पिसारा,
…… च्या संसारी नेहमी सुखाचाच वारा.
समईत लावल्या वाती, उजळल्या ज्योती,
…… माझे जीवन साथी.
मेघ विखुरले सूर्यकिरण आले,
…… वरून धन्य मी झाले.
समईतील ज्योती भक्तिभावाने उजळाविते,
…… नाव प्रेमाने घेते.
बागेतील फुले पूजेसाठी तोडते,
…… चे नाव आनंदाने घेते.
गायीच्या शिंगांना लावला सोनेरी रंग
…….. राव बसले कामाला की होतात त्यात दंग.
गाण्याच्या मैफिलीत पेटीचा सूर
…….. रावांची भेट म्हणजे प्रेमाचा पूर .
आईने वाढविल, वडिलांनी पाढविल
……. रावांनी त्यांची होताच सोन्याने मढविले.
दारापुढे वृंदावन , त्यात तुळशीचे झाड
……… रावांच्या गुनांपुढे दागिन्यांचा काय पाड.
करवत काठी धोतर अन डोक्याला पगडी
….. पंतांची स्वारी पहिलवान सारखी तगडी.
वैशाखाच्या महिन्यात उन्हाळ्याचा जोर
…. घराण्यात…… राव पुरुष थोर.
वसंत ऋतु आला, झाडांना फुटली पालवी
…. रावांच्या संगतीत….. काळ घालवी.
श्रावणाच्या महीन्यात जिकडे तिकडे पाणी
…… रावांच्या भेटीसाठी अतुर चातकावाणी.
चंदनाचा पाट, रुपयाचे ताट !
……. राव भुकेले, सोडा माझी वाट!
Marathi Ukhane For Female
डेटिंग करता करता, आम्ही सारे रेकॉर्ड तोडले…
घरच्यांनी बघितले आणि __शी लग्न लगेच जोडले..
गहु निवडताना, भेटतात खूप खडे,
__रावांना आवडतात, गरम बटाटे वडे.
….
कॉलेजमध्ये शायनिंग मारताना, घालायचे चशमा
__ रावां न्हा मारावा लागतो मस्का..
पाहुणे नाचण्या साठी झाले, पिऊन तराट,
__च नाव घेऊन, प्रवेश करते घरात.
गल्लीतीला हिरो _ आहे माझा, हार्दिक पंड्या.
बिझनेसमध्ये झाला, गेल्यावर्षी फायदा
_ रावांना लग्नात खाऊ घातला मैदा..!!!
Marathi ukhane for male
रात्रीच्या वेळी चमचमतात तारे …
__ च नाव घेतो, लक्ष द्या सारे
प्रेम मध्ये मानता गुलाब फुल
__च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल
प्रेमाच्या पृथ्वीच्या प्रवाहात, किती पण फिरा …
शोधून नाही सापडणार, _सारखा हिरा
जीवनाच्या प्रवासात प्रेमाची साथ
सौ …… ने दिला मला प्रेमाचा हात !!!!
शंकराच्या पिंडीवर नागिणीचा वेढा
सौ…..चा आणि माझा जन्मोजन्माचा जोडा
राधा संग कृष्ण ला बघून ओढ आली सागराला
….. ची जोडी मिळाली माझ्या जीवनाला
राधा संग कृष्ण ला बघून ओढ आली सागराला
….. ची जोडी मिळाली माझ्या जीवनाला
रोमँटिक मोवी बघून आला बहार,
…..ला घालतो २७ मे ला हार.
गुलाबाच्या फुलांचा दरवळला सुगंध
….. च्या सहवासात झालो मी धुंद.
फुलांना पाणी घातल्या वर चमकतो फुलांचा रंग
सुखी आहे संसारात सौ ….. च्या संग !!!!!
दुर्वाची जुडी वाहतो गणपती ला
सौ…..सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला !!!!!
देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सप्तपती चे फेरे,
…. चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे.
आई-वडील, भाऊ बहीण, नंदनवन घर …. च्या आगमनाने पडली त्यात भर.
यमुनेच्या तीरावर कमळाची जाळी पसरली घनदाट,…………….चे बरोबर बांधली जीवन गाठ.
पंचपक्वनाच्या ताटात वाढले आग्र्याचे पेढे, ………चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे.
लग्नातील गाणे वाजे सप्त सुरात, … चे नाव घेतो … च्या घरात.
कीर्तनकार वाजवे गजर त्यामधे वाजे विणा, … चे नाव घेतो सर्व जयहिंद म्हणा.
निलवर्ण आकाशातुन पडती पावसाच्या सरी, … चे नावं घेतो… च्या दारी
Funny ukhane for male
गोव्याहून आणले काजू
ऐकलं का
गोव्या हून आणले
काजू अन्
हीच्या कानाखाली द्यायला
मी का बरं लाजु…!!
डाळित डाळ प्रेमाची डाळ
डाळीत डाळ ती फक्त तुरीची डाळ
आता बघाचं कसं खेळवतो हिच्या मांडिवर
एका वर्षात बाळ…!!
MSEB च्या तारेवर टाकले होते आकडे…
@MSEB च्या तारेवर टाकले होते आकडे…वाकडे
अजून लग्नच माझ नाही ठरलयं
तर व कोणाच घेऊ गं माकडे..!!
पावाबरोबर खाल्ले लावून बटर…
पावाबरोबर खाल्ले
अमूल बटर…
हीचं नाव घ्यायला
अडलय माझ खेटर…!!
उभा होतो मळयात, नजर गेली खळयात…
उभा होतो मळयात, नजर गेली खळयात…
Demond हार घालेल ते पण फक्त हीच्याच गळयात….!!
नाशिक ते औरंगाबाद वाटेत पेरला लसूण….
नाशिकः ते औरंगाबाद वाटेत पेरला लसूण….
आणि
ह्यांच्या बहिणी लग्नाला आल्या ते पण गाढवावर बसून….!!
बशीवर बशी डबल बशी
ऐका आता बशीवर ती झाली डबल बशी
अन तिला सोडुन बाकीच्या झाल्या आता संगळ्याच जाड्या म्हशी….!!
खोक्यात खोका मेणबत्ती च खोका..
ऐका खोक्यात खोका मेणत्तीच खोका…
नाही नाही म्हणता हिने पण
कापून खाल्ला की बोका….!!
घेतला पाव शेर रवा तर घेतला पाव शेर खवा….!!
@ घेतला पाव शेर रवा तर घेतला पाव शेर खवा…
Quarantine मध्ये माझी ही म्हणते
धनी आज रात्र भर……
आशिर्वाद आहे सर्वांना ब्रम्हा, विष्णू आणि महेश…
__ रावांचे नाव घेऊन, करते गृहप्रवेश…!!
सर्वांपुढे नमस्कारासाठी, जोडते दोन्ही हात…
__रावांचे नाव घेते, पण सोडा माझी वाट…!!
आमच्या दोघांचे स्वभाव, आहेत Complementary…
__ रावांचे नाव घेऊन करते, घरात पटकन Entry..!!
उंबरठ्यावरती माप ऑलांडून, सुखी संसाराची चाहूल…
__च्या जीवनात टाकले मी, आज पहिले पाऊल..!!
सकाळी चहा दुपारी बर्गर…
_आहे, माझ्या Life चा Server..!!
दिसतो इतका गोड, की नजर त्याच्या कडे वळते…
__च्या एका स्माईल ने, दिवसभराचे टेन्शन पळते..!!
एमेघ इंद्राधनुष्यात ष्यात मल्हार रंगताच श्रावणसर कोसळते,
….. नावाने मंगळागौर सजवते…!!
निलवर्ण आकाशात चमकतो शनी
….नाव घेते मंगळागौरी पूजनाच्या दिवशी…!!
सासर आह औशी, सासू आहे होशी,
…. चे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी..!!
सौभाग्यवतीचे अलंकार म्हणजे हातात काचेचे चुडे,
….. रावांचे नाव घेते मंगळागौरी पुढे..!!
हिरव्या हिरव्या गावाणातील रानात चरत होते रानात ,
—– रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच कारण ..!!
आकाशात चमकतो तारा अंगठीत चमकतो हिरा…..
रावाच्या सुखी संसारात समावलास माझा आनंद..!!
डब्यात डबा डब्यात होता केक …..राव माझे आहे लाखात एक..!!
एक तीळ सात जण खाई ….. रावाना जन्म देणारी धन्य ती आई..!!
हिरवा हिरवा शालू त्यावर मोराचा पदर …. रावांच नाव घेते ठेऊन तुमचा आदर..!!
परातीत परात सोन्याची परात …… रावांची लेक आणली….. मी….. रावांच्या घरात..!!
लग्नात गाण्याचा खर्च हुंडा एक खोक्का
….. रावांचे नाव घेते ….. कुणीतरी ह्यांना दांडक्याने ठोक्का..!!
आला आला उन्हाळा। संगे घामाचा ह्या धारा …
….. रावांचे नाव घेते लावून ac चा थंड वारा..!!
भारताचा कर्णधार, विराट कोहली आहे ऑलराऊंडर,……
आहेत डॉक्टर, आणि मी त्यांची कंपाऊंडर.!!
सुपा मुठभर गहू
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ…!!
झेन्डुचे फुल हल्ते डुलु डुलु,
आमचे हे दिसतात जसे गाढवाचे पिलु..!!
वेलची वेनी जाईचा गजरा,
आमच्य़ा दोघां वरति सगळ्य़ा च्य़ा नजरा..!!
नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद
………तर आहेत माझ्या डाव्या खिशात..!!
पाव शेर रवा पाव शेर खवा
…. चे नाव घेते हजार रुपये ठेवा…!!!
Romantic Marathi ukhane list
आंब्याच्या तोरणामध्येर, आंब्याचे पान, _च्या नादाने झालो मी बेभान.
हो-नाही म्हणता म्हणता, लग्न जुळले एकदाचे, __मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे.
कळी हसेल, फुल उमलेल, मोहरून येईल सुगंध, _च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद.
पक्षांचा थवा, दिसतो छान_आली जीवनात, वाढला माझा मान
चित्रकला मध्ये असते कलेची निर्मिती, _वर जडली माझी प्रीती.
तांब्या मध्ये तांबे चांदीची तांबे आणि परात, लेक आणली मी च्या घरात.
___माझी आहे, सर्व स्वयंपाका त कुशल,____तुमच्या येण्यानं झाला, दिवस एकदम स्पेशल.
आयुष्याची वाढ होत वाढदिवस करू साजरा, _तुला आणला मोगऱ्याचा गजरा.
संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी, माझी, _म्हणते एका सुरात गाणी.
यमुनेच्या तीरावर राधा वाजविते बासरी, _सोबत सुखी आहे सासरी.
टीव्ही वर बघत होते क्रिकेट, ला पाहून, पडली माझी विकेट!
सर्वांच्या आशीर्वादाने परमेश्वर सुखी ठेवो _आणि माझी जोडी.
Satyanarayan Pooja Ukhane in Marathi
पावसाळ्यात पडतात बर्फाचे खडे, ……. रावांचे नाव घेते सत्यनारायणापुढे
आयुष्याच्या गोड फुलांच्या राशी…
…… रावांचे नाव घेते, सत्यनारायणाच्या दिवशी
हातात भरला चुडा, गळ्यात घातली ठुशी,
…. रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी
Marathi Ukhane for Female Satyanarayan Pooja
सीता जसे राम रामायण, ….. चे नाव घेते आज आहे सत्यनारायण
अंगणात घातला मंडप, त्यावर फुलांचे तोरण, …. चे नाव घेते सत्यनारायण पूजेचे कारण
सोन्याच्या ताराने विणलेली पैठणी नेसले, घातला चपलाहार आणि ठुशी
… चे नाव घेते सात्यानारायण पूजेच्या दिवशी
मंडळी मंडळी आहेत खूपच हौशी
…… रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी
Ukhane In Marathi For Haldi Kunku
बाहुबली मध्ये, शोभतो प्रभा,
_ रावांच्या नावामुळे, कुंकवाची शोभा..!!
मावळा सूर्य चंद्र उगवला आकाशी …..
नाव घेते हळदी कुंकू वाच्या दिवशी..!!
मंगल दिनी मंगळकर्याला आंब्याच्या पानांचं बांधता तोरण ….
रावांच नाव घ्यायला हळदी कुंकू वाच कारण..!!
सवरगिय नंदनवनात सोन्याची केळी …..
रावांच नाव घेते हळदी काही कुंकवाच्या दिवशी..!!
देवाच्या देवरात फुलांच प्रथम स्थान …..
रावांच नाव घेते राखते तुमचा सर्वांचा मान..!!
Modern ukhane In Marathi
डेटिंग करता करता, आम्ही सारे रेकॉर्ड तोडले…
घरच्यांनी बघितले आणि __शी लग्न लगेच जोडले..!!
गहु निवडताना, भेटतात खूप खडे,
__रावांना आवडतात, गरम बटाटे वडे..!!
कॉलेजमध्ये शायनिंग मारताना, घालायचे चशमा
__ रावां न्हा मारावा लागतो मस्का..!!
पाहुणे नाचण्या साठी झाले, पिऊन तराट,
__च नाव घेऊन, प्रवेश करते घरात…!!
गल्लीतीला हिरो
_ आहे माझा, हार्दिक पंड्या…!!
बिझनेसमध्ये झाला, गेल्यावर्षी फायदा
_ रावांना लग्नात खाऊ घातला मैदा..!!
Marathi chavant ukhane
इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव
__रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !!
ताटात ताट चांदीच ताट मुठभर गहू
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ..!!
लग्नामध्ये घालतो एकमेकांना माळ
हिच्या मांडिवर खेळविन एका वर्षात बाळ..!!
लग्न पंक्तीत लावला मस्का
अन गणपतरावां ना लागला ठसका..!!
सगळे देतात मान….चे नाव घेते खाऊन तंबाखू पान..!!
उंदीर मामाचे असतात इवले इवले पाय
…. राव घरी परतले नाहीत, कुठे पिऊन पडले कि काय..!!
Bus stand वर लागलाय सेल अन साड्यांवर आहे म्हणे 10% ची सूट,
अन अक्ख्या गळीत ….बाई तू आहेस खडूस..!!
नव्या आयुष्याची अद्भुत गाणी, अन देशमुखाच्या घराण्यात आमची सासुबाई झाले राणी..!!
खुर्ची वर , तिच्यावर बसला होला,
सखा पाटिल मेला म्हनणून तुका पाटिल केला..!!
एक होति मिऊ एक होती काऊ,
…ना घास भरवला तर मि काय खाऊ?
उन्हात उभा राहिला कि हा दिसतो सावला
…सकाळी ५ वाजता याचा उभा राहतो बाहुला..!!
Tommy म्हटलं कि बोलतात यू-यू , आणि
… तू मला खूप आवडतोस म्हणून मी बोलते I love You..!!
पहिला नापसंत केला कारण तो होता सायकल वाला,
म्हणून तुझ्यावर प्रेम केल तर तू निघाला Band वाला…!!
भर उन्हामुळे माझा रंग झाला काळपट
काहो ननंदबई तुम्ही लहानपणापासूनच आहेत का अशा येडपट..!!
पौर्णिमेच्या रात्री सारखा नवरा माझा चिकना बाई,
पण माझा birthday जर विसरला तर त्याची खैर नाही..!!
Watch the Popular Marathi Ukhane on youtube
FAQ
Q1. मराठी उखाणे म्हणजे काय?
मराठी उखाणे म्हणण्याची पारंपारिक पद्धत कॉल-अँड-रिस्पॉन्स फॉरमॅटमध्ये आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती पहिला भाग वाचतो आणि बाकीचा प्रतिसाद दुसऱ्याने देतो. ते वारंवार टाळ्या वाजवतात किंवा हाताच्या इतर हालचाली करतात.
Q2. मराठी उखाणे उद्देश काय आहे?
मराठी उखाणे समारंभांमध्ये विनोद आणि आनंदाची भावना जोडण्यासाठी वापरली जातात, विशेषत: विवाहसोहळ्यांमध्ये. लग्न समारंभ आणि त्यापूर्वीच्या विविध प्रसंगी त्यांचे वारंवार पठण केले जाते.
Q3. मराठी उखाणे कसे पाठ केले जातात?
मराठी उखाणे म्हणण्याची पारंपारिक पद्धत कॉल-अँड-रिस्पॉन्स फॉरमॅटमध्ये आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती पहिला भाग वाचतो आणि बाकीचा प्रतिसाद दुसऱ्याने देतो. ते वारंवार टाळ्या वाजवतात किंवा हाताच्या इतर हालचाली करतात.
Q4. मराठी उखाणे मध्ये काही सामान्य थीम काय आहेत?
मराठी उखाणे मध्ये प्रेम, लग्न, कुटुंब, परंपरा या विषयांवर वारंवार चर्चा होत असते. ते इतिहास किंवा संस्कृतीतील विशिष्ट व्यक्ती, प्रसंग किंवा विश्वासांचा संदर्भ देखील देऊ शकतात.
Q5. मराठी उखाणे लग्न आणि इतर समारंभाबाहेर वापरता येईल का?
होय, सामान्य बोलण्यात विनोद आणि बुद्धी इंजेक्ट करण्यासाठी तुम्ही अनेक परिस्थितींमध्ये मराठी उखाणे वापरू शकता. तरुणांनाही ते वाचायला आवडत असले तरी, महाराष्ट्रातील जुन्या पिढ्यांना ते विशेषतः लोकप्रिय वाटतात.
Q6. मराठी उखाणे तयार करण्यासाठी काही नियम किंवा मार्गदर्शक तत्त्वे आहेत का?
मराठी उखाणे लिहिण्यासाठी कोणतीही कठोर मार्गदर्शक तत्त्वे नसली तरी, त्यांच्यात अनेकदा यमक रचना असावी आणि ती सर्जनशील किंवा विनोदी असावी. जरी ते परिस्थिती आणि लक्ष्यित प्रेक्षकांसाठी स्वीकार्य असले पाहिजेत, तरीही ते सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक विषयांचे संदर्भ देखील देऊ शकतात.
Q7. मराठी उखाणे इतर भाषांमध्ये अनुवादित करता येईल का?
इतर भाषांमध्ये अनुवादित केल्यावर मराठी उखाणे वैशिष्ट्यपूर्ण बनवणारा विनोद आणि यमक टिकवून ठेवणे कठीण होऊ शकते. मूळ मराठी भाषेला अंतर्भूत असलेले सांस्कृतिक संदर्भ आणि अर्थ अनुवादादरम्यान गमावले जाऊ शकतात.
Q8. मराठी उखाण्यांची उदाहरणे कुठे मिळतील?
पारंपारिक मराठी साहित्य तसेच चित्रपट आणि संगीत यांसारख्या माध्यमांच्या अलीकडच्या प्रकारांमध्ये मराठी उखाण्यांची उदाहरणे आहेत. वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी मराठी उखाणे शेअर करण्यासाठी असंख्य वेबसाइट्स आणि सोशल मीडिया पेजेस आहेत.
Q9. मराठी उखाणे आजही लोकप्रिय आहेत का?
होय, मराठी उखाणे आजही पारंपारिक महाराष्ट्रीय संस्कृतीचे प्रिय घटक आहेत आणि आजही लोकप्रिय आहेत. ते अजूनही विवाहसोहळा आणि इतर प्रसंगी वापरले जातात आणि ते सोशल मीडिया आणि इतर चॅनेलद्वारे देखील प्रसारित केले जातात.
Q10. बिगर महाराष्ट्रीयन मराठी उखाणे वाचू शकतात का?
गैर-महाराष्ट्रीय लोकांना मराठी उखाणे शिकणे आणि वाचणे शक्य असले तरी सांस्कृतिक संदर्भाचा आदर करणे आणि त्यांचा जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे. उखाने योग्यरित्या समजून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी, त्यांच्या सांस्कृतिक उत्पत्तीबद्दल आणि महत्त्वाबद्दल जाणून घेणे देखील फायदेशीर ठरू शकते.
निष्कर्ष
तर मित्रांनो आपण वरील लेखात Marathi Ukhane वर छान अशी पोस्ट पाहिली. यात आपण मराठी उखाणे पुरुषासाठी (Marathi Ukhane for Male), मराठी उखाणे स्त्रीसाठी (Marathi Ukhane for Male), रोमँटिक मराठी उखाणे (Romantic Marathi ukhane), सत्यनारायानाच्या पूजेसाठी (Satyanarayan Pooja Ukhane in Marathi), आधुनिक उखाणे मराठीत (Modern ukhane In Marathi) हे सर्व पाहिले. आमच्या टीम रिसर्च करून तुम्हाला छान छान मराठी उखाणे देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला हा लेख कसा वाटला हे नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा.
🚫Important Warning For all bloggers and content publishers© : All Marathi Ukhane published on this site is copyrighted by site OWNERS & our Skilled Writers. we also have legal documents for our content. Without permission any type of commercial use of our content will be subjected to copyright violation and it may cause you in trouble. |
Also read this: Best Gruhpravesh Ukhane in Marathi | गृहप्रवेश उखाणे मराठी